बायकोचं ऐकून जेव्हा मुलाने बापाला काढलं घराबाहेर ! बापाने अशी जिरवरी पोराची ।।

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

जय जय स्वामी समर्थ” रमेशच लग्न झालं होतं,त्याला दोन मुले होती. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता तो. अतिशय उत्तम असं सगळं कुटुंब होतं. त्याचे वडील तर अतिशय शांत आणि प्रामाणिक स्वभावाचे होते. कुटुंबामध्ये सगळं वातावरण अतिशय सुंदर होतं.

पण अचानक एके दिवशी त्या कुटुंबाला कोणाची नजर लागली आणि रमेशच्या आईचे निधन झालं. रमेश आई गेल्यानंतर त्याने एका महिन्यातच वडिलांसोबत भांडण करायला सुरुवात केली. बाबा तुमच्यामुळे मला खूप त्रास होतोय, घरामध्ये खूप भांडण होत आहे, घरामध्ये माझ्या बायकोला आई गेल्यामुळे घरातील सर्वच कामे करावी लागतात.

तुमच्यासमोर ती साडी घालून काम करते आणि साडी घालायला तिला आवडत नाही, तिला खूप अवघडल्यासारखं होतं, तिला मॉडर्न लाईफ जगायला आवडतं आणि तुमच्या संस्कारामुळे तिला ते जगायला येत नाही. बाबा,तुम्हाला एक विनंती आहे,कृपा करून तुम्ही आता घराच्या खाली असलेल्या गॅरेजमध्ये राहिला जा.

रमेशने आपल्या वडिलांना खूप मोठं घर असूनसुद्धा गॅरेजमध्ये राहिला सांगितलं.वडिल काहीच न बोलता आपलं सामान घेऊन गॅरेजमध्ये राहायला गेले. काही दिवसानंतर वडील त्या घराच्या पायऱ्या वर चढून आले आणि घराची बेल वाजवली, रमेशने घराचा दरवाजा उघडला आणि त्याला वाटलं त्याचा परत भांडण होणार.

पण बाबा काहीच बोलले नाही आणि त्यांनी रमेश चाहत्यांमध्ये काही तिकिटे दिली आणि त्यांनी सांगितलं बाळा, तुम्ही दहा दिवस ट्रीपला जाऊन या ही त्याची तिकीट आहेत. तस ही तुम्ही आई गेल्यानंतर खूप उदास उदास आहात. जरा बाहेर फिरून आला तर थोडं मन हलकं होईल.

रमेशने ची तिकीटे घेतली आणि आपल्या बायकोकडे गेला आणि म्हणाला बघ, ही बाबांनी आपल्याला फॉरेन ट्रीप ला जाण्यासाठी तिकीट दिले आहेत. बायको म्हणाली, तुम्ही जास्त लक्ष देऊ नका आपल्याशी गोड बोलून घरांमध्ये यायचं असेल त्यांना, तसही तिकीटे मिळाली आहेत आपण फिरून येऊ की.

रमेश आपल्या कुटुंबासोबत निघून गेला दहा दिवसाची ट्रिप होती. तिकडे रमेश आपल्या फॅमीली सोबत ट्रिपचा आनंद घेत होता आणि इकडे मात्र त्याच्या बाबांनी सगळा गेमच पालटून टाकला. त्यांच जे साठ लाखाचं घर होतं, ते घर अवघ्या तीस लाखांमध्ये विकून टाकलं.

त्यांच मन उदास होतच पण त्यांनी त्यांच्यासाठी नवीन घर घेतलं व रमेशच्या सर्व सामान एका भाड्याच्या घरामध्ये नेऊन ठेवलं. रमेश जेव्हा दहा दिवसानंतर ट्रीप वरून आला तेव्हा त्याने आपल्या घराला कुलूप पाहिलं आणि घराच्या समोर एक गार्ड बसला होता.

रमेशने त्याला विचारलं की, बाबा तू इथे काय करतो आहे? आमच्या घराला कुलूप कसं काय? माझे वडील कुठे आहेत? त्यावर तो म्हणाला, तुमचं वडील इथून गेलं पण ते म्हणाले की तुम्ही आल्यानंतर मला त्यांच्याशी फोनवरती जोडून दे, तू काय जोडून देणार आहेस?

रमेश रागाने म्हणाला, मीच त्यांना फोन लावतो पण फोन बंद होता. तो गार्ड म्हणाला, अहो तुमचा फोन लागणार नाही माझ्याकडे त्यांनी एक नंबर दिला आहे त्यावरती फोन करा असे म्हंटले होते ते आणि त्या गार्डने तो नंबर डायल केला आणि रमेश जवळ दिला.

त्यावर रमेशचे वडील म्हणाले, तिथेच थांब मी पंधरा मिनिटात तुझ्या जवळ येतो नंतर तुला सगळ्या गोष्टी समजावून सांगतो. थोड्याच वेळात तिथे एक कार आली, कारमधून रमेशचे वडील उतरले आणि रमेशच्या हातामध्ये किल्ली दिली आणि त्याला सांगितलं, तुझ्यासाठी भाड्याच्या घराची व्यवस्था केली आहे आणि एक वर्षाचा भाडसुद्धा मी भरलेल आहे.

आता तुम्ही तिथेच रहा,जा, तुम्हाला कसं राहायचं तस राहा. तुझ्या बायकोला कसं राहायचं, कसं वागायचं, तसं वागू दे. पण मला मात्र त्रास देऊ नका रे बाबांनो. त्यावरती रमेश म्हणाला, बाबा तुम्ही कुठे राहणार आहात? वडील म्हणाले, माझ्यासाठी मी सुंदरसं घर खरेदी केला आहे.

मी तर खुश आहे. आता तुला कुठे राहायचं तिथं तू खुश रहा. ही छोटीशी कथा खूप काही शिकवून जाते. आपले आई-वडील आपल्या सोबत असणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यांचा सन्मान करा. नाहीतर ते तुमचा सन्मान करणं सोडून देतील. म्हणूनच आई-वडिलांचे आशीर्वादासोबत आणि त्याच्या प्रेमासोबत करा असं काही काम झकास की, प्रत्येकाला वाटेल तुमच्या सारखं काही खास.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *