राज्यात अवकाळी पाऊस, पुढील 2 दिवस पावसाची शक्यता!!

Pune प्रादेशिक

नवीन वर्षात महाराष्ट्र राज्य हवामान खात्याने केलेल्या अंदाजानुसार पुन्हा राज्यात अवकाळी पाऊस काही भागांत झाला असल्याने या पावसामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांचे तोंडाजवळ आलेले पिकाचे नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने गहू, तुर, मका, हरभरा, गुरांचा चाऱ्याचे नुकसान झाले आहे. तसेच मका आणि गहू तर अक्षरशः झोपला आहे. यापूर्वीच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे.

महाराष्ट्र राज्यातील काही भागात नवीन वर्षात पहिला पाऊस पडला. दरम्यान हिवाळा सुरु असताना अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अजून 2 दिवस राज्यातील काही भागांत पाऊस पडणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने नुकतीच दिली आहे. यामध्ये राज्यात शनिवारी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण आहे.

राज्यात विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागांत शनिवारी तसेच रविवारी हलक्या पावसाचा अंदाज दर्शवला आहे. आग्नेय दिशेने येणाऱ्या बाप्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सांगली शहरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तारांबळ उडाली. तसेच ऐन थंडीच्या कडाक्यात पाऊस पडल्यानंतर थंडी पुन्हा वाढली आहे.

त्यामुळे आज मध्यरात्री अचानक मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. सुमारे 10 ते 15 मिनिटे पावसा पडला. त्यामुळे अचानक पडलेल्या या पावसामुळे हवेत गारवा वाढला असून शेतकरी राजा मात्र चिंतेत पडला आहे. त्यामुळे या वळीव पावसामुळे पुन्हा द्राक्ष पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

तसेच बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा तालुक्यातील आव्हा, तळणी, लिहा, पिंप्री गवळी या परिसरासह इतर गावात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, तुर, मका, हरभरा, गुरांचा चाऱ्याचे नुकसान झाले असून मका आणि गहू तर अक्षरशः झोपला असल्याचे चित्र दिसत आहे. यापूर्वीच अनेकदा राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आता पुन्हा या भागातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाताचा गेला आहे.

तसेच शेतकऱ्यांनी दुसरीकडे मोठ्या आशेने रब्बी हंगामात शेतकऱ्याने लागवड केली आहे. तसेच पिकांना रात्रंदिवस जागून खते आणि पाणी दिले. आता पीक हातातोंडाशी आलेला असताना निसर्गाने घास हिरावून घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून याची नुकसान भरपाई कशी होते हे पाहणे आवश्यक आहे. तसेच या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *