आपल्या जवळची माणसं आपल्याशी वाईट वागतात तेव्हा? हे एक गोष्ट नक्की करून पहा ।।

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“जय जय स्वामी समर्थ” आपल्या जवळची माणसं आपल्याशी वाईट वागतात तेव्हा? तेव्हा एक प्रयोग करून पहा नक्की तुमचा त्रास थांबेल, पण कोणता प्रयोग? थोड्या आनंदाच्या लहरी आपल्या वाट्याला येऊ लागल्या की समजून जायचं दुःख पाठोपाठ दार ठोठावण्यासाठी येतच असेल.

सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो. सुख उपभोगताना जेवढा आनंद होतो तेवढच दुःख पचवताना त्रास होतो, कारण दुःखाचे कारण आपल्याच जवळपासचे लोक असतात.ज्यांना आपण लळा लावला त्यांनी आपला घात केला. हे कटू सत्य गळ्याखाली उतरत नाही.

आपणच काय खुद्द धनुर्धर अर्जुनाला ही रणांगणावर याच गोष्टीचा त्रास झाला होता. युद्ध तर करायचं पण कोणाशी ?आपल्याच भावंडांशी,गुरुजनांशी, नातलगांशी मग यांना आपण इतके दिवस यांना आपले मानत होतो का? अशा गोंधळलेल्या स्थितीत भगवान श्रीकृष्णांनी त्याची समजूत काढत म्हटलं, अर्जुना हे जग असंच आहे.

तू ज्यांना आपलं मानतो ते जर तुला आपलं मानत असतील तर हातात तलवार, गधा आणि धनुष्य घेऊन तुझ्यावर चाल करून आले नसते.तू त्यांच्याबद्दल लोभ,मोह,शोक अशा सगळ्या भावना आवर आणि केवळ कर्तव्य म्हणून धर्म रक्षणार्थ युद्ध कर.

अर्जुनासोबत तर स्वतः भगवंत होते, पण आपलं काय? आपली समजूत काढायला देव किती वेळा येणार? रोजच्या जगण्यात आपलीही अवस्था अर्जूनासारखीच होते.अशावेळी भगवंतांनी अर्जुनाला दिला तोच सल्ला आपल्याला लागू होतो. “माझे माझे आणि झाले ओझे” अशी गत होण्याआधी स्वतःला आवरा,सावरा भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थितीशी दोन हात करा.

हेच तत्वज्ञान प्रख्यात लेखक व. पु काळे यांचे ‘वपुंची माणसं’ हे पुस्तक वाचताना लक्षात येत. त्यात गजाभाऊ नामक पात्राच्या तोंडी बापूंनी आधुनिक भाषेत जगण्याच मर्म सांगितलं आहे. आपण जो जन्म घेतला आहे तो अपेक्षा पूर्तीसाठी नाही आपल्या दुसऱ्यांकडून अपेक्षा असतात असं नाही बर का?

आपल्या स्वतः कडून ही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत,उरतात फक्त जळणाऱ्या व्यथा.माझ्या मते हा जन्मा अपेक्षा पूर्तीसाठी नाही तर हा जन्म परतफेडीसाठी आहे. तुमच्या सौभाग्यवती गेल्या तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतला, याचा अर्थ कोणत्यातरी जन्माची परतफेड झाली.तो अकाउंट संपला.

याच दृष्टिकोनातून सगळ्यात लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा. मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत, ही सुद्धा तुम्ही कोणती तरी परतफेड करत आहात.परत फेडीचाचा हिशोब या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हाला मरण नाही. तेव्हा मनातल्या परमेश्वराला उद्देशून मला का जगवलंस?असा प्रश्न विचारू नका.

कोणतीही व्यक्ती असो ती तुमच्याशी विचित्र वागली, तिने तुमचा अपमान केला, तुमच्या कडे दुर्लक्ष केलं,तुमच्या उपकाराचं कोणाला विस्मरण झालं,तर एक एक अकाउंट पूर्ण झालं अस आजपासून स्वतःला सांगायला लागा. बँकेतील शिल्लक संपली की पासबुक अकाउंट क्लोज असा शिक्का मारतात ना तस.

त्याच प्रमाणे आपले किती अकाउंट क्लोज झाले याचा विचार करा आणि पासबुकच जाळून टाका. परतफेडीचा एकही क्षण टाळू नका,प्रारंभी तुम्हाला जड जाईल पण आपलं मन जेवढे बलदंड असतं तेवढंच लवचिकही असतं. त्या मनाला सांगायचं की, बाबा रे आयुष्यभर तुझा ऐकलं, तुझ्या हुकुमात राहिलो आता ही गुलामी मी सोडून देत आहे.

आज पासून मुक्त केला आहे स्वतःला. हा प्रयोग करून बघा किती खाते फटाफट बंद होतात याची प्रचिती घ्या. उद्या जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने ओळख दाखवली नाही तर तुमच्या पासबुकात त्यांची एकच एन्ट्री होती असं समजा, मग कोणी कितीही त्रास दिला तरी त्याचा त्रास तुम्हाला होणारच नाही.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *