नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” आपल्या वास्तूमध्ये वास्तूदोष आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्या वास्तूमध्ये ज्या घरांमध्ये शुल्लक कारणांवरून लोक एकमेकांशी भांडतात, अगदी किरकोळ कारणांवरून जेवताना सुद्धा कटकटी होतात, शारीरिक किंवा मानसिक कष्ट करून सुद्धा रात्री झोप लागत नाही.
अशा घरात हमखास वास्तुदोष आहे हे समजाव. अनेक जण वास्तूदोषावर उपाय म्हणून आपल्या वास्तूची घराची तोडफोड करतात, हे शास्त्रसंमत नाही. अशा प्रकारे वास्तूची तोडफोड केल्यास वास्तूला वास्तू भंगाचा दोष लागतो. वर्षातून किमान एकदा आपल्या घरात आपण उदक शांती करून घ्या.
जर तुम्हाला वाटतं की, तुमच्या वास्तूमध्ये घरांमध्ये वास्तुदोष आहेत तर वर्षातून किमान एकदा उदकशांती करावी. ते जर शक्य नसेल तर कमीत कमी वर्षातून एकदा दही भात नारळ यांचे उतारे घरावरून करावेत. किंवा तुम्ही घरच्या घरी ग्रहयज्ञ सुद्धा करू शकता.
उदक शांती, वास्तुशांती, गृहशांती हे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्या वास्तूला तेजोवलय म्हणजेच प्रकाशमान करण्याचे. या सर्व गोष्टींनी आपल्या घराला गृहसौख्य लाभते, आपल्या घरामध्ये सुख शांती नांदू लागते. जेव्हा-जेव्हा तुमच्या नव्या घराचा दरवाजा, कवाड जर तुटलं तर लक्षात घ्या.
घरातील स्त्रियांना याचा अतोनात त्रास होतो आणि म्हणूनच शांती कर्म करणे आवश्यक असतं. नव्या घराचा दरवाजा किंवा कवाड जर तुटलं तर घरातील स्त्रियांना, महिलांना, मुलींना त्याचा त्रास होऊ लागतो आणि म्हणून शांती कर्म करतात. जेव्हा जेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा बदलला जाईल, तेव्हा आपलं घर नव्याने जन्म घेतं.
आणि म्हणून अशा घराची वास्तु शांती करणे गरजेचे असते. नवीन घरामध्ये प्रवेश करताना जर घरात जर घुबड शिरलेल्या दिसलं किंवा त्या घरांमध्ये मधमाशांनी पोळ केलं असेल घरात किंवा घराच्या बाहेर, कबुतरांनी घरटे केला असेल, एखाद्या व्यक्तीचा अपमृत्यू झाला असेल किंवा घराचा पण दरवाजाच बदलला आहे अशावेळी वास्तुशांती नक्की करून घ्या.
हे सर्व ग्रंथ संमत आहे. आपल्या घर जर घर खरच खूप मोठ आहे आणि एखादी खोली कायमस्वरूपी बंद असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जवळपास अनेक अदृश्य शक्तींचा वावर त्या बंद खोलीत निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून घरातील एखादी खोली कायमस्वरूपी कधीच बंद करून ठेवू नका.
दिवसातून अगदी पाच मिनिटे का होईना मात्र तिथे आपला वावर असायला हवा. मनुष्यांचा माणसांचा वावर आपल्या संपूर्ण घरात असायलाच हवा. ज्या ठिकाणी माणसांचा वावर असतो त्या ठिकाणी अन्य जे पशुपक्षी प्राणी आहेत त्यांना माणसांचा गंध जाणवतो आणि याउलट जर आपला वावर त्या ठिकाणी नसेल तर मग तिथे पारवे,पकुळ्या, पाली, चिमण्या मांजरी, गांधील माशा असे उपद्रवी प्राणी हे त्या ठिकाणी गोळा होतात.
त्यांच्या प्रमाणेच अदृश्य शक्तींना सुद्धा मानवी गंधाच्या गैरहजेरीत आपोआपच या मोकळ्या जागेमध्ये मोकळे रान मिळते. त्याचा संचार तिथे होऊ लागतो आणि म्हणून अशी ही बंद असलेली खोली आहे ते आपण झाडून पुसून घ्यावी ते पाच दहा मिनिटे जावं आणि हे करणे शक्य नसेल तर दररोज केवळ एक अगरबत्ती तिथे लावून आला तरी हे चालतं.
कारण या अगरबत्तीने त्या खोलीतच संपूर्ण वातावरण चैतन्यमय राहत. विशेष करून आपल्या वास्तूचा पूर्व दिशेकडेच्या, उत्तर दिशेकडीलच्या आणि ईशान्य दिशेकडेच्या ज्या खोल्या आहेत त्या कधीच बंद अवस्थेत ठेवू नयेत. त्यांचा नित्य वापर आपण करायला हवा. वास्तुपुरुषाच्या प्रतिमेबद्द्ल अनेक लोकांना माहिती नसत.
जी वास्तुपुरुषाची प्रतिमा आहे ती वास्तू सभोवतालच्या जागेत पुरू नये, मग ती पुरावी कुठे? तर मुख्य वास्तु जी आहे त्या मुख्य वास्तूच्या आत मध्ये आग्नेय कोपऱ्यात पालथ्या स्थितीमध्ये आपण ही वास्तुपुरुषाची प्रतिमा निक्षेप करावी आणि जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम आहेत, सण-समारंभ आहेत तेव्हा तिथे हळदी-कुंकू आणि नैवेद्य दाखवायला विसरू नये.
यामुळे वास्तुपुरुष आहेत ते प्रसन्न रहातात आपल्या वास्तूचे भरभराट होते. गृहप्रवेश करताना किंवा पायाभरणी करताना ती नेहमी दिवसा करावे रात्री करू नये. रात्री केलेली पायाभरणी किंवा गृहप्रवेश त्या घरातील कर्त्या पुरुषाला किंवा कर्त्या स्त्रीला अनेक प्रकारचे त्रास निर्माण करतो.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.