नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” स्वामी भक्त हो संपूर्ण विश्वाचे मालक दत्तावतार असणारे, श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या भक्तांच्या कायम पाठीशी असतात. जो भक्त स्वामींचे मनोभावे पूजा करतो, स्वामींची सेवा करतो त्यांच्या पाठीशी स्वामी कायम उभे राहतात आणि वेळप्रसंगी बघता देखील त्याची प्रचिती देत राहतात.
असेच एकदा स्वामी आपल्या एका भक्ताच्या स्वप्नात येतात आणि त्याला सांगतात की तुझ्या प्रामाणिक भक्तीवर आम्ही खूप प्रसन्न आहोत. आज तुला आमच्याकडे जे मागायचे असेल ते माग तुझी काय इच्छा असेल तर सांगा मला आम्ही नक्की पूर्ण करू.
स्वामींचे हे बोलणे ऐकून तो भक्त खूप खुश होतो आणि स्वामींना सांगतो की हे स्वामी राया, परमात्मा, तुझ्या आशीर्वादाने मी माझ्या जीवनात खूप खुश आहे. सगळ्या बाबतीत मी संतुष्ट आहे,परंतु हे स्वामीराया मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. त्यासाठी आपण मला त्याची अनुमती द्यावी. यावर स्वामी म्हणतात, विचार तुला काही विचारायचे आहे.
त्यावर तो फक्त स्वामींना विचारतो की, स्वामीराया मी असे ऐकले आहे की, माणसाचे नशीब हे त्याच्या जन्म व्हायच्या अगोदर पासून तुम्ही लिहून ठेवलेलं असतं, हे खरं आहे का?. यावर स्वामी म्हणतात की, हो हे खरं आहे. प्रत्येकाचा नशिब आम्ही आधीपासूनच लिहून ठेवलेलं असतं.
हे ऐकून तो भक्त स्वामींना पुन्हा विचारतो की, स्वामीराया ही गोष्ट खरी आहे, तर मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आणि तो पुढे स्वामींना विचारतो कि, स्वामी माझं नशीब पण तुम्ही लिहून ठेवलं असेल, तर मी माझ्या नशिबात पुढे काय घडणार आहे ते पाहू शकतो का? स्वामी तुम्ही मला ते नक्की दाखवू शकता का?
यावर स्वामींना भक्ताला म्हणतात की, ही गोष्ट अशक्य आहे, गोपनीय आहे परंतु तू आमचा निष्ठावंत सेवेकरी आहेस,तू प्रामाणिक आहेस, म्हणून तुझी इच्छा आम्ही पूर्ण करू. तुझं नशीब जे आम्ही लिहून ठेवला आहे ते तुला मी नक्की दाखवू. चल आमच्या सोबत. असे म्हणून स्वामी त्याला.
स्वर्गात गेल्यावर तिथे भली मोठी खोली असते, त्या खोलीमध्ये सगळीकडे चारही बाजूंना करोडो वह्या पुस्तके ठेवलेली असतात. ही वह्या पुस्तक पाहून तो भक्त खूप घाबरतो आणि स्वामींना विचारतो, स्वामी ही वह्या-पुस्तके एवढ्या मोठ्या प्रमाणावर येथे ठेवले आहेत?
त्यावर स्वामी म्हणतात की, या पुस्तकांमध्ये सातशे करोड लोकांचे नशीब लिहिला आहे. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी येथे लिहून ठेवले आहे. यावर तो भक्त खूप खुश होतो आणि स्वामींना म्हणतो की स्वामी सर्वात आधी मला माझ्या आसपासच्या माणसंच भविष्य जाणून घ्यायचं आहे.
हे ऐकून स्वामी त्याच्या हातात एक पुस्तक देतात आणि त्याला म्हणतात, तुला ज्या कुणाचं नशीब जाणून घ्यायचा आहे ते सर्व या पुस्तकात आहे. तो फक्त खूप खुश होतो ते पुस्तक हातात घेतो त्या पुस्तकाचा पहिलं पान उघडतो आणि त्या पानावर त्याच्या शेजारचा नाव लिहिलेलं असतं.
हे बघून तो फक्त स्मितहास्य करतो, कारण त्याच्या शेजारच्या व्यक्तीच्या नावाच्या खाली काही सुद्धा लिहिलेलं नसतं.पूर्ण पान रिकामे असतं त्यावर तो मनातल्या मनात स्वतःला म्हणतो की, त्याच्या शेजारी राहणाऱ्या त्या व्यक्तीचा नशीब त्याच्या डोक्या सारखा रिकामी आहे.
म्हणून या पुस्तकात याच्या नावाखाली काही सुद्धा लिहिलेलं नाही. असं म्हणून तर दुसरे पान उघडतो, त्या पानावरती त्याचे स्वतःचे नाव लिहिलेलं असतं, परंतु जेव्हा तो स्वतःच्या नावाचा पानावर बघतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसतो, कारण ते पानसुद्धा पूर्ण रिकाम असत. त्यावर काहीसुद्धा लिहिलेलं नसतं.असं म्हणून तो भक्त पुस्तकातले प्रत्येक पान उघडून बघतो.
त्या प्रत्येक पानावर वेगवेगळ्या लोकांची नावे लिहिलेली असतात परंतु त्यांच्या नावाखाली काही सुद्धा लिहिलेलं नसतं. पूर्ण पान रिकामे असतं यावर तो भक्त स्वामींना म्हणतो की, स्वामी तुम्ही तर मला हे पुस्तक दिलं होतं, ज्यामध्ये सगळ्यांचे नशीब लिहून ठेवला आहे. असं तुम्ही म्हणाला होतात. परंतु स्वामी हे पुस्तक पूर्णपणे रिकामी आहे.
यामध्ये काही सुद्धा लिहिलेलं नाही. यावर स्वामी म्हणतात की, मी सगळ्यांचे नशीब या पुस्तकामध्ये लिहून ठेवला आहे परंतु मी एका वेगळ्या शाईमध्ये ते लिहून ठेवल आहे. ही एका वेगळ्या प्रकारचे अदृष्य शाई आहे. म्हणून या प्रकारच्या शाईमध्ये लिहिलेलं कोणी सुद्धा वाचवू शकत नाही, कोणी पाहू शकत नाही, म्हणून तुला काही लिहिलेलं दिसत नाही.
परंतु तू निराश होऊ नकोस. मी तुला सांगतो की, या पुस्तकांमध्ये मी काय लिहून ठेवला आहे. तर या पुस्तकामध्ये प्रत्येकाच्या नावाखाली फक्त एकच शब्द मी लिहून ठेवला आहे. स्वामींचे हे बोलणे ऐकून तो भक्त खूप आश्चर्यचकित होतो आणि स्वामींना विचारतो स्वामी हे कसं शक्य आहे? फक्त एकच शब्द.
तुम्ही प्रत्येक मनुष्याचा नावाखाली फक्त एकच शब्द कसा लिहून ठेवला आहे. एक मनुष्य तर 60- 70 किंवा 75 ते 80 वर्षे आयुष्य जगतो. त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये घडणाऱ्या घटना त्याचा संपूर्ण आयुष्य तुम्ही एका शब्दामध्ये कस लिहून ठेवला आहे. हे कसं शक्य आहे यावर स्वामी म्हणतात, हो हेच खरं आहे.
प्रत्येकाच्या नशिबात मी फक्त एकच शब्द लिहून ठेवतो. मी जेव्हा पण कोणाचा नशीब लिहितो तेव्हा मी फक्त एकच शब्द घेतो आणि तो शब्द आहे.”तथास्तु” जशी तुझी इच्छा. स्वामी पुढे म्हणतात की, मी प्रत्येकाच्या नशिबात फक्त हेच लिहून ठेवतो. जी तुझी इच्छा आहे तसेच होईल.
म्हणून माणूस हा स्वतःच त्याच्या कर्मासाठी, त्याच्या नशीबासाठी, त्याच्या भविष्यासाठी जबाबदार आहे. जर कोणी सुखी आहे तर तो स्वतःला जबाबदार आहे. जर कुणी दुःखी आहे त्याला पण तो स्वतः जबाबदार आहे. माणूस असा विचार करतो तसेच त्यांच्या सोबत नेहमी घडत राहते.
हे ऐकून तो भक्त स्वामींना विचारतो की, स्वामी तुम्ही म्हणाला जो जसा विचार करतो तस त्याच्या सोबत होतं. मग कोणी माणूस स्वतःहून दुःखी का बनेल? तो स्वतःआम्हला दुःखी करा असा विचार का करेल? असा विचार कोणी मनुष्य करू शकत नाही. तर अशा लोकांच्या नशिबात दुःख का बरे येते.
यावर स्वामी म्हणतात, एखाद्या देहाच्या कर्माची विचारांच्या बिया आधीपासूनच लावून ठेवतो. म्हणून त्या व्यक्तीने लावलेल्या त्या विचाराच्या बियांमधून त्याच्या कर्माच झाड बनून जात. नंतर त्या कर्माच्या झाडाचं रूपांतर कालांतराने त्याच्या सवयीमध्ये होत जातं. आणि नंतर त्या सवयीचे रूपांतर त्याच्या नशिबामध्ये होत जातं.
तो भक्त विचारतो की, बघ त्या माणसाच्या आयुष्यात किती दुःख आहे. यावर स्वामी म्हणतात की, त्यांचे नशीबच दुःख आहे त्यांनी खूप आधीपासूनच दुःखाच्या बिया त्यांच्या आयुष्यात पेरलेल्या गेल्या आहेत आणि नंतर सुद्धा त्याच्या दुःखाचा रूपांतर एका झाडांमध्ये होऊन ते झाड खूप मोठ्या प्रमाणावर वाढत जातं.
म्हणजेच तुम्ही पाच वर्षापूर्वी जो काही विचार केला असेल त्याचं फळ तुम्हाला लगेच भेटणार नाही. तुमच्या विचारांचा जे काही फळ असेल ते तुम्हाला खूप वर्षानंतर, खुप दिवसानंतर भेटणार आहे. म्हणून माणसाला विचार, कर्म आणि नशीब या मधला जो संबंध असतो तो त्याला कधीच समजत नाही.
स्वामी पुढे म्हणतात, तू सगळ्यात आधी तुझ्या आसपासच्या लोकांचे नशीब जाणून घेण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली होती, त्यापैकी एकाच उदाहरण मी देतो, तुझे जे अमुक अमुक शेजारी आहेत, ते एकदा आजारी पडले होते. त्यांना अर्धांगवायू झाला होता.यावर तो भक्त म्हणातो की, होय हे खर आहे स्वामी. पण स्वामी त्यांच्या वाटेला इतकं मोठं दुःख का बर आलं ?
तो खूप चांगला माणूस आहे.यावर स्वामी म्हणतात,तो व्यक्ती त्याचा व्यवसाय मध्ये लाबडीमध्ये काम करत होता, म्हणून कालांतराने त्याच्या कर्मामुळे तो कर्जदार बनला.त्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आणि व्यवसाय बंद पडल्यामुळे तो विचार करू लागला की काही करून मला या कर्जापासून मुक्ती मिळाली पाहिजे.
मला आता काही सुद्धा नको. मला माझ्या कार्यालयात जायचं नाही,नाहीतर कर्जदरी लोक माझ्याकडे पैसे मागतील. मला यातून लवकरात लवकर मुक्ती मिळूदे. बस मग तेच झालं.त्याची इच्छा पूर्ण झाली. त्याला अर्धांगवायू झाला. त्याच्या शरीराला लकवा मारला आणि त्याला कुठेही जाता येणार नाही असेच घडले. अशाप्रकारे माणूस सुद्धा आपल्या विचारांच्या बिया पेरतो.
त्याचे झाड बनतं त्याला तो खत पाणी देतो त्याला कर्माच खत पाणी देऊन आणि मग तो देवाला नावे ठेवतो, परंतु तो स्वतः त्याच्या नशिबाने जबाबदार असतो. हे सुद्धा ते त्याच्या कर्मामुळे. स्वामींचे हे बोलणे ऐकून त्या भक्तांचे डोळे उघडतात आणि तो स्वप्नामधून जागा होतो आणि स्वामींना हात जोडून म्हणतो.
स्वामीमहाराज आज तुम्ही मला सुखी जीवनाचा मंत्र दिला आहे, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे.आणि हा सुखी जीवनाचा मंत्र आणि तसेच तुम्ही मला जे काही सांगितले आहे ते मी अवश्य सगळ्यांना सांगेन. “श्री स्वामी समर्थ” ” जय जय स्वामी समर्थ”
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.