नमस्कार स्वामी भक्तांनो आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतो “श्री स्वामी समर्थ” महाराज यांना त्रिवार वंदन करून आजचा अनुभव सांगायला सुरुवात करते. तू मला सोडून कुठे दूर का जात नाहीस, अगदी देवा घरी गेलीस तरी चालेल मला! तुझी लाज वाटते असं बोलत गजा घराबाहेर पडला.
त्याला त्याच्या आईचा खूप राग आला होता. आज तिच्यामुळे वर्गातली मुले मला चिडवत होती. आणि हे आता रोजचेच झाले होते एका डोळ्याजी चा पोरगा हे जणू माझ नावाच पडलं होतं. उठता बसता सगळे मला याच नावाने बोलवायला लागले होते. मला आता हे असह्य झालं होतं.
मला हे हि माहिती होते की यामध्ये आई ची काहीच चूक नाहीये, पण तिच्यामुळे मला हे सगळे असे चिडवत आहेत म्हणजे तिची चूक. असे मनात ठरवून गज्या घराबाहेर पडला. गज्या च्या जन्मानंतर च गज्या चे वडील देवाघरी गेले वाटणीच्या जमिनीवर देखील भावकीने डल्ला मारला.
पण गज्या ची आई खमकी होती सगळ्यांना तोंड देत होती. गावातली चार धुणीभांडी करत होती पण आपल्या लेकराला तीने काहीही कमी पडू दिले नव्हते.पण अजिंक्ययोध्याला हरवणारे त्याचे आपलेच असतात.आज गज्या ने आपल्या आईचा पराभव केला होता तिची लायकी काढली होती.
मनातून ती पार पोखरून गेली होती. त्या गरीब आईला वाटत होते की आपलं पोर रागीट आहे. संध्याकाळपर्यंत परत येईल मिसरूड फुटायच्या वयात रक्त खवळते मुलांचे ती त्याची वाटच पाहत होती. गज्या ला त्याची आई कोणत्याही किमतीमध्ये नको हवी होती.
रस्त्याने जाणाऱ्या बसला ते पोरगं पाठीमागून लटकल आणि गाडी नेईल त्या दिशेने गेले. आपण कुठे जातोय काय करतोय त्याला काही माहिती नव्हते. गाडी पुण्याला गेली पुण्याला उतरल्यावर पहिल्यांदा त्याला भुकेची जाणीव झाली. आईचे पोळीवरचे तूप वाढणे त्याला आठवले.
पण नको त्या जुन्या आठवणी, गज्या कसेबसे दिवस काढत होता आदल्या दिवसापेक्षा पुढच्या दिवशी जास्त मेहनत करत होता. गज्या ची मेहनत करायची देणगी त्याला तेच्या आईपासूनच मिळाली होती. त्याची आई कोणतेही काम कमी जास्तपणा न करता प्रामाणिक पणे करत असे.
गज्याच्या मेहनतीला फळ मिळायला सुरुवात झाली गजाने स्वतःची एक चहाची टपरी टाकली टपरी खूप चांगल्या प्रकारे चालायला लागली. व्यवसायाचे गणित गजा च्या चाणाक्ष डोक्यात घुसले होते अनुभव कामाला यायची वेळ झाली चहाची टपरी आता हॉटेलमध्ये बनली होती.
पुढचे काही वर्षे म्हणजेच गज्या चा सुवर्णकाळ 3, 3 हॉटेलचा मालक झाला होता. एके दिवशी गजानन शेठ आपल्या गाडीतून चालले होते. एक म्हातारी त्यांना ओळखीची वाटली, ती म्हातारी त्याची आईच होती. त्याने ड्रायव्हरला विचारायला लावले की ही म्हातारी कुठे चालली आहे ते पहा.
तिच्या हातात गज्याच्या घरचा पत्ता होता. आईविषयीचा त्याचा द्वेष जागा झाला आणि त्याने त्याच्या आईच्या हातातील चीठ्ठी काढून घेतली आणि ती फाडून टाकली. आपली आई जेवली का? ती कशी आहे? विचारायचे देखील त्याने कष्ट घेतले नाहीत. रात्रभर तो आईचाच विचार करत होता.
महीने गेले आणि एके दिवशी त्याला असे वाटले की, आईने आपल्याला जन्म दिलाय तिचे काय चालले आहे हे पाहून तरी यायला हवे आणि त्याने भली सकाळी गाडी काढली आणि गावाच्या दिशेने निघाला. त्याची आई उन्हात एका लाकडाला टेकून बसली होती.
तो जवळ गेला त्याने आईला हाक मारली पण काहीही उपयोग झाला नाही. कारण त्याची आई त्याच दिवशी देवाघरी गेली होती. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला आई विषयी वाईट वाटत होते. आईच्या हातात एक कागदाची चिट्ठी सापडली. गज्याने डोळे पुसत पुसतच ती चिट्टी उघडली.
त्यात असे लिहिले होते की प्रिय गजानन तू कधीतरी मला भेटायला येशील पण कदाचित तेव्हा मी नसेल म्हणून हे पत्र लिहून ठेवत आहे. मला नेहमीच माहिती होते की, तुला माझ्यामुळे चिडवतात आई आंधळी असल्यामुळे बाळा तुला किती त्रास झाला. मला नेहमी वाटायचं तू परत येणार आजही याच आशेने मी इथे बसली आहे.
तू नक्कीच येणार माझा गज्या माझ्या कुशीत येणार आणि मी नाही भेटले तरी माझे बाळ मी जिथे असेल तिथे खुश असेल, पण बाळा तुझा माझ्यावरचा राग कदाचित ही एक गोष्ट समजल्यावर कमी होईल. तू लहान होतास खेळत होतास आणि अशातच गावाला सोडलेला कथाल्या उधळला.
उधळलेला कथाल्या तुझ्याच दिशेनं येत होता मी तुला वाचवण्यासाठी पळाले माझ्या बाळाला तो धडक देणार होता. माझ्या कडे इतका वेळ नव्हता की तुला मी उचलून घेऊन पळू शकेल मी त्याच्यावर चाल करून गेले आणि गज्या तुझी आई तिथेच आंधळी झाली. त्या जनावराने मला उचलून टाकले आणि त्याचे टोकदार शिंग माझ्या डोळ्यात घुसले.
2 दिवस शुद्धित नव्हते पण बाळा ज्या वेळी शुद्ध हरपत होती ना त्यावेळी मला माझा गज्या सुरक्षित आहे. हे पाहून मी समाधानाणे डोळे बंद केले होते. आपले आई वडील हे श्री स्वामी समर्थ महाराज यांचेच जिवंत रूप आहे.
आपल्याला ते लाभले आहेत, हेच सौभाग्य कारण तिन्ही जगावर राज्य करणारा देखील आईची छाया डोक्यावर नसेल आणि बापाचा हात पाठीवर नसेल तर भिकारी असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा महिमा हा संबंध जगभरात गाजावा ही आपना सर्वांची कामना आहे.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.