अमोल कोल्हेंना उमेदवारी देणं ही सर्वात मोठी चूक; उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली..

प्रादेशिक

पहिल्या 2 वर्षातच खासदार अमोल कोल्हे कंटाळले होते आणि राजीनामा देण्याचे ते बोलत होते. मात्र, यात चूक आमचीच होती जी त्यांना विकासकामे करण्याची आवड आहे की नाही, हे पहायला हवे होते. डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन आणि त्यांचा प्रचार करून आमचीही चूक झाली आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरमध्ये शेतकरी मेळाव्यात स्पष्ट म्हणाले.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी शिरूरमध्ये शेतकरी मेळावा घेतला, त्यामध्ये या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी डॉ अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली असल्याचे दिसून आले. यावेळी अजित पवार म्हणाले की, वक्तृत्व चांगले आहे आणि दिसायलाही रुबाबदार आहे. पुढे काही तरी चांगले काम करतील, असे विश्वास वाटल्याने अन्य पक्षाचे असतानाही त्यांना उमेदवारी दिली.

मात्र अमोल कोल्हे 2 वर्षातच कंटाळले. निवडून आल्यानंतर 2 वर्षांतच अमोल कोल्हे यांनी राजीनामा देण्याची भाषा सुरू केली असल्याचे ते म्हणाले. तसेच जनतेने 5 वर्षांसाठी निवडून दिले आहे. त्यामुळे 2 वर्षांत राजीनामा देणे योग्य नाही, असे मीच त्यांना सांगितले. मात्र कलावंत असल्याने त्याचा व्यावसायावर परिणाम होत आहे. सेलिब्रेटी असल्याने रोज मतदारसंघात येणे शक्य नाही, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

तसेच अमोल कोल्हे यांना तुम्हीच पक्षात घेतले आहे, तुम्हीच त्यांची समजूत काढा, असे पक्षाचे नेते मला वारंवार सांगू लागले. मात्र, कोणाच्या डोक्यात काय आहे? हेच कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे राजकारण हा त्यांचा पिंड नाही. एखाद्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी हेमा मालिनी, धर्मेंद्र किंवा गोविंदा, सनी देओला सारखे मोठे सेलेब्रिटी अनेक वेळा निवडणुकीला उभे रहातात.

तसेच लोक त्यांच्याकडे पाहून मतदान देखील करताना अनेकवेळा आपण पाहतो. मात्र त्यांचा राजकारणाशी काय संबंध नाही. विकासकामे करण्याची आवड आहे की नाही, हे पहायला हवे होते. ती चूक झाली, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांनी मला निवडणुकीची संधी दिली, तसेच कलावंताला उमेदवारी देणे ही चूक होती, असे पवार साहेब म्हणत होते.

त्यांनी काही कलावंतांचीही उदाहरणे दिली. मात्र त्यांनी दिलेल्या एकाही खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाला नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न मांडताना मला 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा राजकारणातील अलिखीत नियम आहे. तो मी नेहमीच पाळतो.

मात्र सातत्याने आरोप करत असाल तर आणि माझ्यासारख्या कलावंताला उमेदवारी देणे चूक असेल तर 10-10 वेळा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात येण्यासाठी निरोप का पाठविण्यात आले. तसेच लपून-छपून भेटीगाठी करण्याचे कोणते कारण होते? असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *