22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या भव्य दिव्य अशा मंदिराचं उद्घाटना सर्व भारतवासी उत्स्फूर्तपणे वाट बघत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, अयोध्येनगरीतील भगवान प्रभू श्रीराम यांच्या भव्य-दिव्य अशा मंदिराचं उद्घाटन उद्या 22 जानेवारी रोजी होणार असून त्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
तसेच त्याच दरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे भाषण करतेवेळी म्हणाल्या की, आता ते जय श्रीराम म्हणतात, पण सुषमा स्वराज या नेहमी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणत असे. त्यामुळे ते आता जरी जय श्रीराम म्हणत असले तरी आम्ही महिला ‘मर्यादा पुरुषोत्तम राम’च म्हणू, असे एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या..
दरम्यान, सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, आम्ही मर्यादेत राहूनच राजकारण आणि समाजकारण करतो. भगवान प्रभू श्रीराम यांच्यामध्ये जेवढे गुण आहेत, ते सर्व गुण आपल्यामध्ये येऊ शकत नाही. कारण आपण अनेक चुका करतोच, पण त्यांचे गुण जेवढे आत्मसात करता येतील, त्यासाठी प्रयत्न तर करूच शकतो, असे आवाहन उपस्थित नागरिकांना खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
भगवान विष्णूच्या 10 अवतारांपैकी राम हा 7वा अवतार मानला जातो. प्रभू रामजींनी अशी अनेक कामे केली आहेत ज्यांच्या कार्याचे आजही कौतुक केले जाते. प्रभू रामाने आपले संपूर्ण आयुष्य मर्यादेत राहून व्यतीत केले आहे. कुटुंबातील आई-वडील आणि भावंडांशी कसे वागावे हे त्यांचे वागणे शिकवते. प्रभू राम यांना त्यांच्या गुणांमुळे मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते.
भगवान राम हे महान राजा होते. त्यांनी दया, सत्य, नैतिकता , प्रतिष्ठा, करुणा आणि धर्माचे पालन केले . प्रभू रामाने समाजाच्या सेवेचे उत्कृष्ट उदाहरण मांडले होते. या कारणास्तव त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. प्रभू रामामध्ये असे अनेक गुण आढळतात, जे आजच्या काळात प्रत्येक मनुष्यासाठी असणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यांचे चारित्र्य आणि कृत्ये रामायणात नमूद आहेत, जे त्यांचे मूलभूत मानवी गुण आणि आदर्श मांडतात. याशिवाय प्रभू रामामध्ये दयाळूपणाचा गुणही आढळतो . प्रत्येक व्यक्तीमध्ये हा गुण असला पाहिजे. त्याच्या दयाळूपणामुळे, त्याने प्रत्येकाला, मानव, पक्षी आणि राक्षसांना पुढे जाण्याची संधी दिली. रामायणात भगवान रामाच्या चारित्र्याचा उल्लेख केला आहे, जे त्यांना धर्मासाठी समर्पित व्यक्ती म्हणून सादर करते.