मित्रांनो आपण आत्तापर्यंत एकदा तरी ऑनलाईन शॉपिंग ही केलीच असेल, कधी प्रश्न पडलाय का डिलेव्हरी बॉईज ना कोण ऑपरेट करत असेल, त्यासाठी त्यांना नक्की किती मिळकत मिळत असेल? हे काम आपल्याला करता येईल का? वगैरे.. हे सगळं शक्य आहे शिवाय यातून पुरेशी उत्पन्न देखील तुम्ही मिळवू शकता.
नक्की लॉजिस्टिक पार्टनर काय काम करतो? -लॉजिस्टिक पार्टनर म्हणजे तो व्यक्ती जो Online Shopping sites अर्थात इ- कॉमर्स कंपन्याना त्यांचे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहचविसाठी त्यांना मदत करतो.
यासाठी कोणत्या गोष्टी लागतील? किंवा नक्की किती गुंतवणूक करावी लागेल? – २ ते ३ मोटरसायकल असतील तर उत्तम तसेच १० × १० च स्वतंत्र किंवा भाडे तत्वावर घेतलेली जागा असावी, म्हणजे कम्पनी कडून आलेला माल तुम्हाला ठेवता येईल अशाप्रकारे कमीत कमीत १ लाख रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल तसेच जर तुमचं अगोदरच एखादा कशाचं दुकान असेल समजा किराणा दुकान किंवा मग इतर कोणतही स्टेशनरी वगैरे तिथेही तुम्ही जोडधंदा म्हणून हा लॉगिस्टिक व्यवसाय करू शकता.
प्रोडक्ट डिलीव्हरी स्वतः करणे गरजेचे आहे का? : तर मित्रानो जर तुम्हाला वाटत असेल की प्रोडक्ट डिलिव्हरी तुम्हाला स्वतः ला करावी लागेल तर हे साफ खोटं आहे, तुम्ही एक तर एखादा व्यक्ती १० पर्यंत प्रति महिन्यांने ठेवू शकता किंवा एकतर एका प्रोडक्ट डिलीव्हरी मागे 20rs या हिशोबाने सुद्धा ठेवू शकता.यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पेट्रोल खर्च देण्याची गरज नाहीये किंवा इतर कुठलाही इतर भत्ता देण्याची गरज आहे.
मित्रांनो एका प्रोडक्ट मागे जर तुम्हाला कम्पनी तर्फे 30rs मिळत असतील तर विचार करा एक डिलिव्हरी बॉय जर 40 प्रोडक्ट ची डिलिव्हरी करत असेल तर ४०० रुपये तुम्हाला एका डिलिव्हरी बॉय कडून मिळतील. शिवाय डिलिव्हरी बॉय ला सुद्धा सगळा खर्च जाऊन अगदी 15 हजार रुपये महिना सहज मिळू शकतो.
शिवाय तुम्ही एकापेक्षा जास्त कंपनीकडून लॉगिस्टिक चे काम घेऊ शकता म्हणजे समजा एक कम्पनी जर कमीतकमी 20 हजार रुपये प्रति महिना मिळकत देत असेल तर 3 4 कम्पन्या ह्या अगदी 50 हजारापर्यंत मिळकत सहज तुम्हाला देऊ शकतात.
रजिस्ट्रेशन कुठे आणि कसे करणार? : मित्रांनो प्रत्येक इकॉमर्स साईट ची लॉगिस्टिक ची वेबसाइट ही वेगवेगळी आहे तुम्ही समोरील दुवा वापरून तुमची नोंदणी इथे करू शकता : Amazon लॉगिस्टिक : https://logistics.amazon.in फ्लिपकार्ट लॉगिस्टिक : https://www.flipkartcareers.com Paytm mall लॉगिस्टिक : https://gobig.paytmmall.com/shipping-logistics.
शिवाय याचा एक plus Point असा आहे मित्रानो की तुम्ही जर तुमच्या एरियात रजिस्ट्रेशन केले असेल तर दुसरं कोणीही रजिस्ट्रेशन करू शकणार नाही यामुळे संधी च सोन करा. कारण कमी खर्चात व्यवसाय करायचा असेल तर यापेक्षा तरी उत्तम व्यवसाय इतर कुठला असू शकत नाही.