अखेर पुण्यात धावली मेट्रो अंडरग्राऊंड, लवकरच होणार स्वारगेट ते शिवाजीनगर मेट्रोतून प्रवास..

Pune

शहरातील मेट्रोतील जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक हा मार्ग मुठा नदीपात्राच्या खालून काढण्यात आला असून पुणे शहराच्या इतिहासात प्रथमच अंडरग्राऊड मेट्रो नदीपात्राखालून धावणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ही मेट्रो सुरु करण्यापूर्वी चाचणी देखी करण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे शहरात मेट्रोच्या 2 नवीन मार्गांचे उद्घाटन देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते मागील वर्षी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी करण्यात आला होता. तसेच त्यानंतर पुणे मेट्रो सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड व गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल या मार्गांवर मेट्रो धावत आहेत. तसेच आता पुणे मेट्रोसाठी दुसरा ऐतिहासिक क्षण सोमवारी आला असून गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेली पुणे मेट्रो आज अखेर भुयारी मार्गातून धावत होती.

दरम्यान, पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गातील अंडरग्राउंड मेट्रोची चाचणी यशस्वी झाली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच 3.64 किमी मार्गावर ही चाचणी घेतली गेली असून लवकरच हा मार्ग महा मेट्रोकडून सुरु केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुळा मुठा नदीच्या खालून भुयारातून मेट्रोमधून प्रवासाचा अनुभव पुणेकरांना यावेळी मिळणार आहे.

दरम्यान, पुणे मेट्रोतील जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक हा मार्ग मुठा नदीपात्राच्या खालून काढण्यात आला असून पुणे शहराच्या इतिहासात प्रथमच अंडरग्राऊड मेट्रो नदीपात्राखालून धावणार असून ही मेट्रो सुरु करण्यापूर्वी यशस्वी चाचणी घेण्यात आली. दरम्यान, सोमवारी जिल्हा न्यायालय स्थानकातून सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी मेट्रो निघाली.

तसेच त्यानंतर बुधवार पेठ स्थानक आणि मंडई स्थानक हा टप्पा पार केला. तसेच मेट्रो 11 वाजून 59 मिनिटांनी स्वारगेट स्थानकावर पोहोचली. तसेच चाचणीसाठी मेट्रोचा वेग ताशी 7.5 km ठेवला होता. पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान सर्व स्थानके भुयारी केले असून जिल्हा न्यायालयातील स्थानक 33.1 मी. खोल करण्यात आली असून मग त्यानंतर बुधवार पेठ हे स्थानक 30 मीटर खोल केले गेले आहे.

दरम्यान, मंडई स्थानक 26 मीटर खोल आहे, तर स्वारगेट स्थानक 29 मीटर खोल केली आहे. तसेच मेट्रोचे 97% काम आता पूर्ण झाले असून उर्वरित कामे वेगाने सुरू झाली आहेत. तसेच काही महिन्यांत ते पूर्ण होणार आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत प्रवाशांना पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट असा थेट प्रवास करणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *