akash copra

पुढील वर्षी बेन स्टोक्स-मयांक अग्रवाल सनराईज हैदराबादमध्ये, आकाश चोप्रानी केली “आकाशवाणी”..

क्रीडा

स्टोक्सने ज्या प्रकारे t-20 फायनलमध्ये इंग्लंडला स्वबळावर जिंकून दिले आणि संघासाठी तो किती महत्त्वाचा खेळाडू आहे हे सांगितले. तेव्हापासून त्याला आयपीएलमध्ये सामील करण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. तर बेन स्टोक्स आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्येही शतक झळकावले आहे.

स्टोक्सने आयपीएल 2022 च्या लिलावासाठी त्याचे नाव दिले होते परंतु आता स्टोक्स आयपीएल मिनी लिलावाचा भाग घेतला नव्हता. मात्र, आता तो उपलब्ध असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे तो नेमका कोणत्या संघाकडून खेळतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, सनरायझर्स मिनी लिलावात मयंक अग्रवाल आणि बेन स्टोक्स सारख्या खेळाडूंना खरेदी करण्यावर लक्ष केंद्रित करू शकते, असा विश्वास माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी व्यक्त केला. तसेच IPL 2023 ची तयारी सुरू झाली आहे. सर्व 10 संघांनी पुढील हंगामासाठी कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक खेळाडू सोडले आहेत. या फ्रँचायझीने 16 खेळाडूंना सोडले. त्याचवेळी मुंबई इंडियन्सने 13 तर सनरायझर्स हैदराबादने 12 खेळाडूंना सोडले. हैदराबादने जाहीर केलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार केन विल्यमसन आणि निकोलस पूरन यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे. मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबाद सर्वात जास्त रक्कम मिळवणारा संघ असेल.

खेळाडूंना सोडल्यानंतर आता 42.25 कोटी रुपये शिल्लक आहेत. अशा स्थितीत मिनी लिलावात काही चांगले खेळाडू खरेदी करण्यावर त्याची नजर असेल. सनरायझर्स मिनी लिलावात मयंक अग्रवाल आणि बेन स्टोक्स सारख्या खेळाडूंना खरेदी करण्यावर लक्ष केंद्रित करू शकते, असा विश्वास माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी व्यक्त केला.

कारण यावेळी हैदराबाद संघाकडे तब्बल 42 कोटींहून अधिक रुपये शिल्लक आहेत. एवढ्या पैशात फ्रँचायझी काय करणार? त्यानी संपूर्ण संघच बदलून टाकला. त्यांच्याकडे सध्या 12 खेळाडू आहेत, त्यापैकी 6 वेगवान गोलंदाज आहेत. यामध्ये भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, मार्को जानसेन, उमरान मलिक आणि टी नटराजन यांचा समावेश आहे.

त्यामुळे ते येत्या लिलावात वेगवान गोलंदाज खरेदी करणार नाही, असे मत आकाश चोप्रा यांनी व्यक्त केले आहे. तसेच हैदराबाद संघ खासकरून सलामीवीर मयंक अग्रवालला विकत घेण्याचा प्रयत्न करतील तसेच मनीष पांडेलाही संघात पुन्हा घेण्याचा प्रयत्न करतील. तसेच बेन स्टोक्सवरही त्याची नजर असेल आणि त्याला चांगल्या रकमेत खरेदी करता येईल.

त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि त्यांना आता गोलंदाजांची गरज नाही. विल्यमसनच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार किंवा एडन मार्कराम यांना संघाचा कर्णधार बनवता येईल, असे आकाशला वाटते. दुसरीकडे, इतर फ्रँचायझींबद्दल बोलताना, चेन्नई सुपर किंग्जने 11 वर्षांच्या सहवासानंतर वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होला सोडले.

त्याचवेळी पंजाब किंग्जने माजी कर्णधार मयंक अग्रवाल आणि ओडियन स्मिथलाही सोडले. कोलकाताने पॅट कमिन्स, सॅम बिलिंग्ज, शिवम मावी आणि अजिंक्य रहाणे यांना सोडले. त्याचवेळी लखनौने जेसन होल्डर आणि मनीष पांडे यांना सोडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *