नुकताच टी-20 विश्वचषकातील पराभवानंतर संघ अनेक आजी-माजी खेळाडूच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्येच नुकताच पहिल्या सेमिफायनलमध्ये पाकिस्तानकडून हरलेल्या न्यूझीलंड संघांविरुद्ध होणाऱ्या 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिकासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार असून यामध्ये सर्व सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या मालिकेत टी-20 विश्वचषक संघात समाविष्ट असलेले अनेक अनुभवी खेळाडू ऐवजी नवीन खेळताना दिसणार आहेत. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने टीम इंडिया गुरुवारी टूर्नामेंटमधून बाहेर पडली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय खेळाडूंवर जोरदार टीका होत आहे. अनेक खेळाडूंना संघातून वगळण्याचीही मागणी होत आहे. T20 विश्वचषकाची पुढील आवृत्ती 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केली जाणार आहे. त्याआधी टीम इंडियामध्ये संपूर्ण बदल झाल्याची चर्चा आहे.
टी-20 विश्वचषकातील पराभवानंतर संघाला न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका असल्याने लवकरच मालिकेसाठी नवीन युवा संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय, हार्दिक पांड्या टी-20 आणि शिखर धवन वन-डे संघाचे नेतृत्व करेल अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे. तसेच याआधीही भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने यापूर्वी आयर्लंडमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा संघ पहिल्याच सत्रात चॅम्पियन बनला होता. त्याचबरोबर धवनने गेल्या 2 वर्षांत अनेक एकदिवसीय मालिकांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे.
आतापर्यंत रोहित शर्माला कोणत्याही फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून हटवण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, मात्र त्याच्यावर टी-20 मधून निवृत्ती घेण्याचा दबाव वाढल्याचे बोलले जात आहे. रोहितसह टी-20मधील अनेक वरिष्ठ खेळाडूंचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यात केएल राहुल, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.
तसेच कोहलीचा विचार केला तर त्याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा केल्यामुळे विराट कोहली वगळता अनेक सिनियर खेळाडूंवर दबाव आणायची शक्यता आहे. कारण भारताचे सलामीवीर जोडी पण राहुल आणि रोहितने निराशा केली आहे. हिटमॅनने अर्धशतक ठोकले. त्याचवेळी राहुलच्या बॅटमधून दोन अर्धशतके झळकली. या तिघांबाबत बीसीसीआयवरही दबाव आहे. बोर्डाचे म्हणणे आहे की, हे तीन अनुभवी खेळाडू टी-20 खेळण्याचा निर्णय स्वतः घेतील.
अश्विन, कार्तिक आणि शमी यांची कारकीर्द टी-20 मध्ये संपली असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारची न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड झाली आहे. आता भुवनेश्वरची कारकीर्द हातात आहे. जर त्याने चांगली कामगिरी केली तर तो संघात पुढे राहील, अन्यथा तो बाहेर पडणे जवळपास निश्चित आहे.
याशिवाय, रोहित शर्माने स्वतःहून टी-20 न खेळण्याचा निर्णय घेतल्यास निवडकर्त्यांना नवा कर्णधार शोधावा लागेल. सध्या केएल राहुल हा नियमित उपकर्णधार आहे, पण त्याचा फॉर्म त्याच्याकडे नाही. त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याचे संघातील स्थान आता निश्चित झालेले नाही. अशा स्थितीत राहुलला पुढचा कर्णधार बनवणे कठीण होईल.