गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज 14 फेब्रुवारी पिंपरी-चिंचवड बंदची हाक देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य शासनाने जारी केलेल्या मसुद्याचे सगे-सोयऱ्यांच्या व्याखेसह कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे.
यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज6 14 फेब्रुवारी पिंपरी-चिंचवड बंदची हाक देण्यात आली असून मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शहरात दुचाकी रॅली काढण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच याशिवाय, मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अनेक आंदोलने केली आहेत. तसेच या नवीन वर्षाच्या जानेवारीत म्हणजे काही दिवसांपूर्वी लाखो सहकाऱ्यांसह जरांगे मुंबईच्या दिशेने धडकले होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जवळपास सर्वच मागण्या मान्य देखील केल्या होत्या. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलन स्थगित देखील देण्यात आली होती.
मात्र, त्यानंतर मसुद्याचे सगेसोय-यांच्या व्याखेसह कायद्यात रूपांतर करणे आणि अंतरवली सराटीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत आणि मराठा समाजास दिलेल्या आश्वासनांची पूर्तता लवकरात लवकर करावी. तसंच राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी मनोज जरांगे हे गेल्या 4 दिवसांपासून उपोषण करत आहेत.
तसेच त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज 14 फेब्रुवारी बंदची हाक दिली आहे आणि शहर बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने सर्व शहरवासीयांना केले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्याच्या वतीने भव्य 2 चाकी व 4 चाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीची सुरुवात सकाळी आज 9 वाजता डांगे चौक थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू होणार असल्याचे सांगितले जाते.
मग ही रॅली तेथून काळेवाडी फाटा, जगताप डेअरी, रहाटणी तसेच पिंपरीगाव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे जाणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर रॅली चिंचवड स्टेशन, आकुर्डी तसेच भक्ती-शक्ती समूह शिल्प निगडीकडे जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच तेथून रॅली तळेगाव दाभाडे मार्गे वडगावकडे जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक वडगाव मावळ येथे रॅलीचा समारोप होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चकडून सांगण्यात आले.