सात रामबाण उपाय ज्यामुळे पांढरे झालेले केस होऊ शकतात काळे ।। यासाठी घरगुती उपाय कोणते? ।। सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखात !

आरोग्य प्रादेशिक शिक्षण

पांढरे झालेले केस काळे कसे करायचे आणि तेही घरच्या घरी उपाय करून कोणते असे ते सात रामबाण उपाय आहेत हे आपण जाणून घेऊया. या अगोदर आजीबाईचा बटवा घरगुती उपायांची माहिती आपल्याला मिळेल. खूप लहान वयात केस पांढरे होणे म्हणजे चिर तारुण्यात म्हातारपण आल्यासारखे वाटते.

धकाधकीच्या जीवनात केसांकडे लक्ष देता येत नाही. बहुतेक जणांना कामाचा ताण असतो किंवा प्रदूषणामुळे ही अकाली पांढऱ्या केसांना समोर जावं लागतं. तसेच केमिकल वाले शाम्पू वापराने बोअर चे पाणी, केमिकल वाले पाणी डोक्यावरून घेणे त्यामुळे देखील केस अकाली पांढरे होतात.

केस काळे करणे अथवा कलर करणे यावर एकमात्र उपाय याच्यावर नाहीये. काही घरगुती उपचार करून देखील आपण पांढरे केस पुन्हा काळे करू शकतो. पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी महागड्या उत्पादनांची गरज नाहीय. कारण आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती आयुर्वेदिक उपाय घेऊन आलो आहोत

1.पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता. अर्धा कप दहिमध्ये चिमूटभर काळी मिरची त्याच्यामध्ये चमचाभर लिंबाचा रस मिसळून त्याची पेस्ट करून केसांवर लावावे. कमीत कमी 6 दिवस हा उपाय करवा. सातव्या दिवशी तुम्हाला फरक जाणवेल. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास केस काळे होऊ शकतात.

2.दररोज साजूक तुपाने डोक्याची मालिश करायची साजूक तूप केसांच्या मुळापर्यंत जायला हवं त्याने पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते. हा सुद्धा उपाय कमीत कमी 6 ते 7 दिवस करायला हवा. केस काळे होऊ लागतील तसेच केसांना चमक देखील येईल. यामुळे केसांना कोणत्यासी प्रकारचे नुकसान होत नाही.

3.आंबट तुरट असलेला आवळा तुमच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. फक्त केसांचं नाही तर निरोगी आरोग्यासाठी देखील आवळा फार गुणकारी मानला जातो. महत्वाचा म्हणचे याचा नियमित सेवन केल्याने केसांची समस्या देवगिल दूर होऊ शकते. आवळा पावडरमध्ये लिंबूचा रस घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांवर लावल्याने पांढरे झालेले केस काळे होतात असे बराच अनुभव आहे.

4. कांदाही तुमचे केस काळे करण्यास मदत करतो. दररोज केसांवर कांद्याची पेस्ट लावल्याने पांढरे झालेले केस काळे होऊ लागतील हा उपाय अगदी चमत्कारिक पद्धतीने उपाय दाखवतो. हा उपाय नक्की करून पहा तुम्ही चार ते पाच दिवस हा उपाय करायचा आहे. याने पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते. तसेच केसांना चमक देखील येईल.

5.काळे तीळ खायचे किंवा तिळाचे तेल केसांवर लावायचे आहे. हे तेल केसांच्या मुळापर्यंत जाईल ह्याची फक्त काळजी घ्यायला हवी. हे तेल रोज केसांना लावा. केसांची समस्या दूर होईल.

6.कच्च्या पपईची पेस्ट डोक्याला 10 मिनीट लावून ठेवल्याने केस गळत नाही तसेच कोंडा देखील कमी होतो आणि अकाली पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते हा उपाय देखील 4 ते 5 दिवस करायचा आहे. यामुळे केसांच्या असणाऱ्या इतर समस्या देखील कमी होऊ शकतात. त्याबरोबर केस कळले होण्यास पपई ची मदत होते.

7.दूध अथवा दही मध्ये बेसन घालून त्याची पेस्ट तयार करायची ही पेस्ट डोक्याला लावल्याने याचा लाभ होतो पांढरे झालेले केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होते. हे घरगुती उपाय आहेत, हे घरगुती उपाय आपण सातत्याने केले पाहिजे. आपण हे उपाय केले की आपले केस नैसर्गिकरित्या काळे होतील. यामुळे केसांना कोणत्यासी प्रकारचे नुकसान होत नाही. केस काळे होऊ लागतील तसेच केसांना चमक देखील येईल.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *