10 वी, 12 वीची परीक्षा आता काही दिवसांवर आली असून केंद्रीय शिक्षण मंडळाने या परीक्षेसाठी काही महत्वाचे बदल केले आहेत. त्यामध्ये यंदापासूनच हे बदल लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 10वी, 12 वीच्या परीक्षेला शिक्षणातील टर्निंग पाईंट म्हटले जात आहे. दरम्यान, या परीक्षेनंतर कोणत्या क्षेत्रात करियर करायचे आहे? याचा निर्णय विद्यार्थी घेतात.
आता दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला असून या परीक्षेसंदर्भात महत्वाचे बदल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केले असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (CBSE) परीक्षा येत्या 15 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये CBSE बोर्डाने बदल केला असून हा बदल objective आणि subjective पातळीवर केला जाणार आहे.
यंदापासून सीबीएसईने बहुपर्यायी (MCQ) प्रश्नांची संख्या वाढवली आहे. तसेच वर्णनात्मक प्रश्नांची संख्या कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. CBSE बोर्डाने 10 वी च्या परीक्षेसाठी 50 % प्रश्न योग्यता बेस्ड ठेवले आहे. तसेच केस-बेस्ड प्रश्न आणि सोर्स बेस्ड इंटिग्रेटेड प्रश्न विचारले जाणार असून दहावीत 20% प्रश्न बहुपर्यायी, तर 30% शॉर्ट एंड लॉन्ग असल्याचे सांगितले जात आहे.
CBSE 12 वीसाठी पॅटर्नमध्ये 40% प्रश्न योग्यता आधारावर असणार आहे. 20% प्रश्न MCQ पद्धतीचे तर 40% शॉर्ट एंड लॉन्ग उत्तरे असणारी प्रश्न असणार आहे. दरम्यान, याचबरोबर CBSE 10 वी, 12 वीच्या निकालात टॉपर्स जाहीर करणार नाही. तसेच टक्केवारी देणार नाही. त्यामुळे डिव्हिजन आणि डिस्टिंक्शन मार्क्स सांगितले जाणार नसून यामध्ये एकूण गुणांच्या आधारे प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी दिली जाणार नाही.
90% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी ‘डिस्टिंक्शन’ श्रेणीही बंद करण्यात आली आहे. बोर्ड कोणत्याही विद्यार्थ्याच्या गुणांची एकूण टक्केवारी मोजणार नाही. उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी 10 वी किंवा 12वीच्या गुणांची टक्केवारी आवश्यक असल्यास, प्रवेश संस्था किंवा नियोक्त्याद्वारे मोजली जाईल. तसेच 10 वी, 12 वी परीक्षांचे हॉल तिकीट बोर्डाने जारी केले असून हे हॉल तिकीट शाळा आणि संबंधित महाविद्यालयात दिल जात असल्याचे सांगितले जात आहे..