दहावी, बारावी परीक्षेमध्ये प्रॅक्टिकल गुणांसंदर्भात होणार मोठा बदल..

शिक्षण

राज्य शिक्षण मंडळाने 10 वी व 12 च्या परीक्षेसंदर्भात महत्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला असून हा बदल दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षासंदर्भात असल्याने सांगितले जात आहे. तर यामध्ये आता ही प्रणाली ऑनलाईन केली असून त्यामुळे लवकर निकाल लावणे शक्य होणार असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, दहावी आणि बारावीची परीक्षा पुढील महिन्यात सुरु होणार असून या बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात महत्वाचा बदल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केला आहे. यापूर्वी 10 वी आणि 12 च्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा घेऊन आणि अंतर्गत मूल्यमापनाचे करून मग ते गुण OMR गुणपत्रिकेत पाठवले जात होते.

परंतु आता हे गुण बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यासाठी ऑनलाइन प्रणाली तयार केली जाणार आहे. त्यात मेकर आणि चेकरचा समावेश केला असून त्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य चेकरची भूमिका बजावणार आहेत. दरम्यान, www.mahahsscboard.in या बोर्डाच्या संकेतस्थळावरुन गुण मंडळाकडे पाठवावे जाणार आहेत.

तसेच त्यासाठी मुख्य लॉगिन आयडीवरुन शाळा आणि महाविद्यालयाचा अधिकृत ई मेल, नियुक्त केलेल्या प्रतिनिधीच्या मोबाइल क्रमांक द्यावा लागणार आहे. तसेच शाळेकडून एक किंवा त्यापेक्षा जास्त युजर तयार करणे गरजेचे असल्याचे सांगितले जाते. मग यानंतर संबंधित युजर विषयानुसार प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापनाचे गुण किंवा श्रेणीची नोंद करणार आहे.

तसेच ऑनलाईन एन्ट्री झाल्यानंतर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य चेकरची भूमिका पार पाडणार आहेत. तसेच शाळेच्या युजरने विषयानुसार सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद केल्यानंतर ते तपासणीसाठी चेकरकडे पाठवले जाईल. मग त्यानंतर अंतिम गुण आणि श्रेणी मंडळाला पाठवता येणार आहे.

याचबरोबर, विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक आणि ऑनलाइन नोंदविलेल्या गुणांची प्रिंट घेऊन त्यावर अंतर्गत आणि बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी, मुख्याध्यापकांची सही आणि शाळेचा शिक्का सीलबंद पाकिटात मंडळाकडे जमा करावा लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तसेच या ऑनलाइन प्रणालीमुळे अंतर्गत गुणांचे काम शाळेच्या पातळीवर अद्यावत होणार आहे.

त्यामुळे मंडळाकडील कामाचा ताण कमी होणार असून यामुळे निकाल लवकर लावणे शक्य होणार असल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक हे सर्व चेक करणार असल्यामुळे चुकांची शक्यता नसणार आहे. तसेच काळाप्रमाणे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बदल करत आहे. या अद्यावत प्राणलीमुळे वेळ वाचणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *