100 वर्षांत पहिल्यांदाच या राशीवर अत्यंत प्रसन्न आहेत शनिदेव ।। पुढील 11 वर्षं राजयोगाचे संकेत देत आहेत शनीदेव ।। कोणत्या राशीवर शनीचा शुभ प्रभाव असणार आहे, त्या राशीच्या जातकांचे भाग्य चमकल्या शिवाय राहणार नाही जाणून घ्या या लेखात !

देश-विदेश प्रादेशिक शिक्षण

शंभर वर्षानंतर पहिल्यांदाच या सहा राशिंवर अत्यंत प्रसन्न आहेत शनिदेव. पुढील अकरा वर्ष भाग्योदयचे संकेत. सृष्टीच्या नियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ प्राप्त होत असते. भगवान शनिदेव हे कलियुगाची देवता असून, ग्रहांचे न्यायाधीश, तसेच कर्म फलाचे दाता आहेत.

ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला विशेष महत्त्व प्राप्त असून संपूर्ण बारा राशी शनिदेवाच्या प्रभावाने प्रभावित होत असतात. ज्या वेळी शनीच्या अशुभ प्रभाव या राशींवर असतो त्या राशीच्या जातकांना संघर्षाचा सामना करावा लागतो. पण जेव्हा ज्या राशीसाठी शनी शुभ असतात, किंवा ज्या राशीवर शनीचा शुभ प्रभाव पडतो त्या राशीच्या जातकांचे भाग्य चमकल्या शिवाय राहत नाही.

आज मध्यरात्रीपासून या राशींवर शनिदेव अत्यंत प्रसन्न होणार असून, शनीच्या साडेसातीचा प्रभाव आता कमी होणार आहे. मध्यरात्रीनंतर आश्विन शुक्लपक्ष शततारका भौमप्रदोष 29 सप्टेंबर रोज मंगळवार लागत असून शनिदेव आपली वक्री चाल सोडून मार्गी होत आहेत.

शनीच्या मार्गी होण्याने गेल्या काही वर्षापासून या सहा राशीच्या जीवनात चालू असणाऱ्या साडेसातीचा प्रभाव आता कमी होणार असून, आपले भाग्य चमकाण्यास सुरुवात होणार आहे. गेल्या काळात आपल्याला शनीचा अशुभ प्रभाव असल्याने आपल्या जीवनात वारंवार संकट येत होती, कामात अडचणी निर्माण होत होत्या, हाती घेतलेल्या कामात अपयश, पैशांना बरकत नसणे, मानसिक ताण तणाव, दुःख आणि परेशानीचा सामना करावा लागला असणार.

पण आता इथून पुढे काळ आपल्यासाठी शुभ बनत आहे. शनीच्या कृपेने आता आपल्या जीवनात सुख, समृद्धीची बहार येण्यास सुरुवात होणार आहे. आता दुःखद आणि दारिद्र्याचा नाश होणार आहे. आपल्या जीवनातील कष्टाचे आणि गरिबीचे दिवस जाऊन सुख-समृद्धी मध्ये वाढ होण्यास सुरुवात होणार आहे.

उद्योगधंद्यामध्ये चांगली वृद्धी होणार असून, कार्यक्षेत्रातून भरपूर पैशांची प्राप्ती होणार आहे. शनीदेवाच्या कृपेने आपल्या करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत. करिअरमध्ये अतिशय सुंदर प्रगतीला सुरुवात होणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार असून, प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

आपल्या मानसिक आणि बौद्धिक क्षमतेचा सुधारणा घडून येणार आहे. कोर्ट कचेरी मध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे योग आहेत. उद्योग-व्यापार, कला, साहित्य, क्रीडा, शिक्षा, नौकरी, समाजकारण, राजकारण, अशा अनेक क्षेत्रात भरघोस यश संपादन करण्याचे योग आहेत.

शत्रुवर विजय प्राप्त होणार असून, अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ निर्माण होणार आहे. शनीच्या कृपेने आता आपल्या सुख आणि समाधानात वाढ होणार आहे. यश प्राप्तिचे नवे कीर्तिमान स्थापन करण्याचा काळ आला आहे. आपला वेळ वाया न घालवता आपण पाहुयात की कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या जीवनात साडेसातीचा अंत होणार असून शनी च्या कृपेने भाग्योदय घडून येणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये चांगली वृद्धी होण्यास सुरुवात होणार असून, गेल्या अनेक दिवसापासून मनावर असणारे चिंतेचे दडपण दूर होणार आहे.

कार्यक्षेत्रात प्रगतीला वेग येणार आहे. आपल्या करिअर संबंधी निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत. करिअरमध्ये मनाप्रमाणे प्रगती घडून येण्यास सुरुवात होणार आहे. या काळात घाई गडबड न करता विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. मागील काळात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करणे टाळावे लागेल.

तरुण-तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. नोकरीच्या कामात यश प्राप्त होणार असून, बेरोजगारांना रोजगाराची प्रगती होणार आहे. या काळात धनप्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे. त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करून घेणे आवश्यक आहे.

या काळात भागीदारी किंवा पार्टनरशिपचे व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे. व्यसनापासून दूर राहून चांगली मेहनत केल्यास खूप मोठी प्रगती घडून येणार आहे. यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या जीवनात सुख समृद्धीचे बहार येण्यास सुरुवात होणार असून, शनीच्या कृपेने आनंदात वाढ होणार आहे.

आपल्या करिअरच्या दृष्टीने अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. जीवनात चालू असणारी आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून कार्यक्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त होणार आहे. समाजात मान, प्रतिष्ठा मध्ये वाढ होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कामात येणारे अपयश आता दूर होणार असून, यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. शनीच्या कृपेने आपली बिघडलेली कामे बनणार आहेत, बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. परिवारात आनंद आणि सुखात वाढ होणार असून, प्रगतीच्या नव्या वाटेने जीवनाच्या वाटचालीची सुरुवात होणार आहे.

रागावर नियंत्रण ठेवून शांत चित्ताने कामे करण्याची आवश्यकता आहे. वाईट कामांपासून दूर राहून, चांगले प्रयत्न केल्यास यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही. यानंतर आहे कर्क राशी. शनिच्या कृपेने कर्क राशीचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे.

कुटुंबासाठी पाहिलेली स्वप्ने साकार होण्याचे योग असून, उद्योग व्यापारातून चांगला धनलाभ होण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीला वेग येणार आहे. नवीन सुरू केलेले उद्योग व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहेत. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार असून, प्रगतीच्या नव्या मार्गास सुरुवात होणार आहे.

प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. आता आपल्या जिवनात आनंद आणि सुखाची बहार येण्यास सुरुवात होणार आहे. मनावरील ताणतणाव दूर होऊन मानसिक सुख, प्रसन्नतेची प्राप्ती होणार आहे. काळ अतिशय सुंदर असला तरी मन लावून मेहनत करणे आवश्यक आहे. यानंतर आहे सिंह राशी.

शनीच्या कृपेने सिंह राशीचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे, आणि खूप मोठ्या प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात. राजकारणात एखादे मोठे पद मिळण्याचे योग आहेत. उद्योग व्यापारामध्ये स्थिती समाधानकारक बनणार असून, आपण बनवलेल्या नव्या योजना सफल ठरणार आहेत.

मागील काळात राहून गेली कामे या काळात पूर्ण होणार असून, प्रगती आड येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. कोर्टकचेऱ्या चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. करिअर संबंधी एखादी शुभ वार्ता कानावर येऊ शकते. गेल्या अनेक महिन्यापासून ज्या कामांसाठी प्रयत्न करत आहात, ती कामे या काळात पूर्ण होणार आहेत.

नोकरीत बढतीचे योग असून, समाजात मान-सन्मान यामध्ये वाढ होणार आहे. आपल्या प्रगतीच्या दृष्टीने काळ अतिशय उत्तम असला, तरी शत्रूवर करडी नजर ठेवून असणे गरजेचे आहे. परिवारात सुख समृद्धीत वाढ होणार आहे. यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीच्या जीवनातील साडेसातीचा प्रभाव आता कमी होणार असून शनी मार्गी होताच आपले भाग्य बदलण्यास सुरुवात होणार आहे.

जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे. या काळात भाग्याची साथ प्राप्त होणार असल्यामुळे आपल्या प्रगतीला वेग येणार आहे. कामात येणारे अडथळे आता दूर होणार असून प्रगतीच्या नव्या वाटेने जीवनाच्या वाटचालीची सुरुवात होणार आहे.

उद्योग व्यापारातून आर्थिक प्रगतीमध्ये तसेच प्रप्तीमधे वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अतिशय शुभ आहे. आपल्या करिअरच्या दृष्टीने आता सकारात्मक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या महत्वकांक्षेत वाढ होणार असून ध्येयप्राप्ती चे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.

आपल्या उत्साहात अनेक पटींनी वाढ होणार असून, मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. यानंतर आहे वृश्चिक राशी. शनीच्या कृपेने वृश्चिक राशीचा भाग्योदय घडून येणार असून, कार्यक्षेत्रात प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. आपल्या महत्त्वाकांक्षेत कमालीची वाढ होणार असून, नव्या ध्येय प्राप्तीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात.

उद्योग व्यापारात वाढ होण्यास सुरुवात होणार असून, आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. करिअरच्या दृष्टीने आपण बनवलेल्या योजना सफल ठरणार आहे. या काळात एखादे मोठे ध्येय प्राप्त करण्यात यशस्वी होणार आहात. यानंतर आहे मीन राशी. मीन राशीच्या जीवनात यश आता प्राप्तीला सुरुवात होणार असून, नव्या ध्येय प्राप्तीची ओढ निर्माण होणार आहे.

उद्योग व्यापारामध्ये भरभराट पहावयास मिळेल. या काळात आर्थिक आवक वाढणार असून अनेक समस्यांचा अंत होणार आहे. शनीच्या कृपेने धनलाभाचे योग जमून येतील. मनामध्ये असणारी भय भीती, बैचेनी दूर होणार असून, मानसिक सुखात वाढ होणार आहे. समाजात मानसन्मान प्राप्ती बरोबरच धनसंपत्ती मध्ये वाढ होणार आहे.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या  कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *