” ..तर “दस का बिस” करणाऱ्या शहाण्यांना सरळच करतोच; अजितदादांचा इशारा!!

Pune

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी आणि आकुर्डी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्ग उभारलेल्या गृहप्रकल्पाचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी चिंचवड येथे अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी संगणकीय सोडत काढण्यात आली असून त्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका कार्यक्रमात भाषण केले.

ते म्हणाले की, गरिबांना घर मिळतात तर तुमच्या पोटात का दुखतं? कोण तरी उठतात PIL दाखल करतात आणि मग त्यात अडचणी निर्माण होतात. तसेच त्यामुळे गरिबांना घर मिळण्यास अडचणी येतात, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूरमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांचे वाटप झाले. याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड नगरीत गृहप्रकल्प उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड ही कष्टकरी, कामगारांची नगरी असल्यामुळे तेथील कामगार वर्गाचे घरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका कार्यक्रमात भाषण म्हणाले. तसेच ज्या विकासकांनी पुनर्वसन प्रकल्प रखडवले आहेत, त्यांना नोटीस देऊन त्यांचे प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण करायला हवेत अशाही सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

तसेच पिंपरी आणि आकुर्डी येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्ग पुणे पालिकेने उभारलेल्या गृह प्रकल्पाचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी चिंचवड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी संगणकीय लॉटरी सोडत पार पडली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतांना म्हणाले की, जर गरिबांना घर मिळतात तर तुमच्या पोटात का दुखतं? असा सवाल केला.

तसेच कोण तरी उठतात PIL दाखल करतात आणि त्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे गरिबांना घर मिळण्यास अडचणी येतात असेही अजित पवार यांनी यावेळी म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेत काहींचं नशीब उजळेल. मात्र काहींना घरं मिळणार नाहीत. त्यामुळं नाउमेद होऊ नये. तसेच ज्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल, म्हणून अगदीच भारावून जाऊ नका. पैसे वाचले म्हणून ते उधळू नका. नाहीतर चौफुला, टेम्भुर्णीला जाल व तिथं उधळपट्टी कराल. असं काही करू नका असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *