IPL 2023 च्या पुढील हंगामासाठी संघांनी तयारी सुरू केली आहे. सर्व फ्रँचायझी संघांनी BCCI ने 15 नोव्हेंबर रोजी राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली, अंतिम तारीख निश्चित केली होती. यावेळी मिनी लिलावात असे काही विदेशी खेळाडू आहेत ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. टी-20 विश्वचषकात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली अपेक्षित आहे.
याचबरोबर, इंडियन प्रीमियर लीग 2023 साठी लिलाव यावर्षी डिसेंबरमध्ये होणार आहे. मिनी लिलावापूर्वी सर्व 10 फ्रँचायझी संघांनी आवडत्या खेळाडूंना कायम ठेवले तर उर्वरित खेळाडूंना सोडण्याचा निर्णय घेतला. आता सर्व खेळाडू लिलावात आपले नशीब आजमावतील. यामध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचेही नाव असेल.
याशिवाय, 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव होणार आहे. सर्व 10 संघांनी मंगळवार, 15 नोव्हेंबर रोजी सर्व खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यांना त्यांनी रिटेन आणि सोडले खेळाडू आहेत. दरम्यान, सर्व संघाच्या घोषणेनंतर, अनेक माजी भारतीय क्रिकेटपटूनी केलेल्या भविष्यवाणीमध्ये हे 3 खेळाडू येत्या लिलावात मालामाल होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
ज्यामध्ये इंग्लंडचे अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि सॅम करण तसेच ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन हा आयपीएल 2023 साठी सर्वात महागडा खेळाडू ठरणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या मिनी लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर सर्व फ्रँचायझींची नजर असणार आहे. हैदराबादचा संघ या इंग्लिश अष्टपैलू खेळाडूसाठी मोठी बोली लावू शकतो.
स्टोक्स हा कर्णधार आणि परदेशी खेळाडू दोघांसाठी पर्याय म्हणून बसतो. नुकत्याच झालेल्या T-20 विश्वचषकात त्याने अंतिम फेरीत नाबाद अर्धशतक झळकावून संघाला चॅम्पियन बनवले. या फॉरमॅटमध्ये त्याच्याकडे 533 धावा आणि 25 विकेट्स आहेत.एपी
आकाश चोप्राने ट्विटरवर ट्विट केले की, “जर ग्रीनने त्याचे नाव लिलावासाठी ठेवले तर तो सर्वात महागडा खेळाडू होऊ शकतो. सॅम करण हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. तर बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. लिलाव आश्चर्यकारक असू शकतात. पण हा प्राधान्यक्रम असावा. तसेच ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनने सप्टेंबरमध्ये भारताविरुद्धच्या T20 मालिकेत सर्वांना प्रभावित केले होते.
3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याने 2 अर्धशतके झळकावली. यावेळी तो टी-20 विश्वचषकात खेळला नसला तरी. इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू सॅम कुरनने अनेक वर्षांपासून छाप पाडली आहे. त्याने यंदाच्या T20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आणि तो ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ देखील ठरला. या स्पर्धेत त्याने एकूण 13 विकेट घेतल्या.
त्याने या स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना 5 विकेट घेतल्या होत्या. इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आयपीएल 2022 मध्ये खेळला नाही. तो 2017 आणि 2018 च्या आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक होता. तो अनेक वर्षांपासून आयपीएल खेळत आहे. अलीकडेच त्याने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडसाठी महत्त्वाची खेळी खेळली. अंतिम सामन्यात तो सामना विजेता खेळाडू होता.