नुकताच टी- 20 वर्ल्डकप आनंदात आणि उत्साहात पार पडला आणि इंग्लंड संघचे दुसऱ्या वेळी t-20 कपावर आपले नाव कोरले आहे. दरम्यान, दुसऱ्या सेमिफायनल मध्ये भारत वर्ल्डकप मधून बाहेर पडला होता. टी-20 विश्वचषकातील पराभवानंतर संघाला न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका असल्याने लवकरच मालिकेसाठी नवीन युवा संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
याशिवाय, हार्दिक पांड्या टी-20 आणि शिखर धवन वन-डे संघाचे नेतृत्व करेल अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे. तसेच याआधीही भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने यापूर्वी आयर्लंडमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा संघ पहिल्याच सत्रात चॅम्पियन बनला होता. त्याचबरोबर धवनने गेल्या 2 वर्षांत अनेक एकदिवसीय मालिकांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे.
दरम्यान, भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. याची तयारी सुरू आहे. या दौऱ्यासाठी संघातील अनेक खेळाडून न्यूझीलंडला पोहचले आहेत. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या टी-20 संघाची जबाबदारी सांभाळणार आहे.
अशातच व्यंकटेश अय्यरच्या नावाची चर्चा रंगली आहे. कारण न्यूझीलंड दौऱ्यासाठी युवा ऑलराउंडर व्यंकटेश अय्यरला संघातून वगळण्यात आलं आहे. आयपीएल 2022 पासून व्यंकटेश अय्यरने टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही.
व्यंकटेश अय्यर हा देखील हार्दिक पांड्यासारख्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो, मात्र हार्दिक पांड्याच्या शानदार खेळामुळे त्याला संघात संधी मिळत नाहीये. दरम्यान, हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक 2021 पासून टीम इंडियातून बाहेर होता. त्यावेळी हार्दिक पांड्याच्या जागी व्यंकटेश अय्यरला संधी दिली.
व्यंकटेश अय्यरने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात पदार्पण केले, पण हार्दिक पांड्या संघात आल्यापासून त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकप झाल्या झाल्य आयसीसीने आपला मोस्ट व्हॅल्यूएबल टी 20 वर्ल्डकप 2022 चा संघ घोषित केला.
या संघात फक्त 2 भारतीय खेळाडूंना जागा मिळाली आहे. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली आणि टी 20 रँकिंगमध्ये अव्वल असलेला सूर्यकुमार यादव यांनाच या संघात अंतिम 11 मध्ये स्थान मिळवता आले आहे.
तर दुसरीकडे भारताचा भावी टी 20 कर्णधार म्हणून संबोधला जाणारा हार्दिक पांड्या या संघात 12th मॅन आहे. टी-20 विश्वचषकातील पराभवानंतर संघाला न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका असल्याने लवकरच मालिकेसाठी नवीन युवा संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय, हार्दिक पांड्या टी-20 आणि शिखर धवन वन-डे संघाचे नेतृत्व करेल अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे.
तसेच याआधीही भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने यापूर्वी आयर्लंडमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा संघ पहिल्याच सत्रात चॅम्पियन बनला होता. त्याचबरोबर धवनने गेल्या 2 वर्षांत अनेक एकदिवसीय मालिकांमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे.
आतापर्यंत रोहित शर्माला कोणत्याही फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून हटवण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, मात्र त्याच्यावर टी-20 मधून निवृत्ती घेण्याचा दबाव वाढल्याचे बोलले जात आहे. रोहितसह टी-20मधील अनेक वरिष्ठ खेळाडूंचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यात केएल राहुल, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.