क्रिकेटमधील हा विक्रम मोडणे अशक्यच, फक्त 6 चेंडूत 77 धावा ठोकल्या या खेळाडूने, जाणून घ्या..

क्रीडा

आपल्यापैकी अनेक लोकांना जर कोणी क्रिकेट इतिहासातील सर्वात महाग षटक कोणते असा प्रश्न विचारला तर आपण लगेच ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये एका षटकात 7 षटकार मारत 43 धावा असलेले किंवा युवराज सिंगने मारलेले 6 षटकार सांगतो.

परंतु तुम्हाला माहीत आहे का की, क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक 77 धावाचे होते. उलट त्याचा विक्रम न्यूझीलंडच्या फलंदाजाच्या नावावर आहे. चला तर जाणून घेऊया हा अनोखा रेकॉर्ड..

दरम्यान, काल चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज आणि सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये स्पिनर शिवा सिंगच्या षटकात 6 चेंडूत 43 धावा केल्या, ज्यात 7 षटकारांचा समावेश होता,

परंतु क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक नव्हते. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर ली जर्मनने क्रिकेटच्या एका षटकात 70 धावा दिल्या. क्रिकेटच्या कोणत्याही षटकात फलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम धावसंख्या होती.

दरम्यान, न्यूझीलंडकडून चार कसोटी सामने खेळलेला माजी क्रिकेटपटू बर्ट व्हॅन्सच्या नावावर क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकण्याचा विक्रम आहे. त्याच्या ओव्हरमध्ये त्याने 77 धावा लुटल्या होत्या.

1990 साली एका प्रथम श्रेणी सामन्यात कॅंटरबरीचा खेळाडूच्या जर्मन लीने एकाच षटकात 70 धावा दिल्या होत्या. त्याचवेळी त्याचा सहकारी खेळाडू रॉजर फोर्डने 5 धावा केल्या. या षटकात बर्ट वन्सने एकूण 22 चेंडू टाकले.

क्राइस्टचर्चमध्ये कॅंटरबरी विरुद्ध वेलिंग्टनच्या शेल ट्रॉफी सामन्याच्या अंतिम दिवशी ही घटना घडली. वेलिंग्टनचा हा हंगामातील शेवटचा खेळ होता आणि त्यांनी डाव घोषित केला आणि कॅंटरबरीला 59 षटकांत 291 धावांचे लक्ष्य ठेवले.

कँटरबरीची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या 108 धावांत त्याचे 8 विकेट पडले, त्यामुळे वेलिंग्टन हा सामना सहज जिंकेल असे सर्वांना वाटत होते, पण त्यानंतर गोष्ट बदलली.

वेलिंग्टनच्या कर्णधार-यष्टीरक्षकाने एक योजना आखली आणि न्यूझीलंडचा फलंदाज बर्ट व्हॅन्स, जो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटचा सामना होता, त्याला गोलंदाजी करायला लावली.

जर्मन ली आणि रॉजर फोर्ड यांनी सोप्या गोलंदाजीविरुद्ध धावा केल्या तर तो चूक करेल आणि बाद होईल, असा विश्वास कर्णधाराला होता. पण कर्णधाराचा हा डाव त्याच्यावर उलटला.

कारण बर्ट वन्सने षटकाची सुरुवात अतिशय खराब केली. त्याने सलग नो बॉल टाकले. पहिल्या 17 चेंडूंमध्ये त्याच्याकडे फक्त एक चांगला चेंडू होता.

मात्र, यादरम्यान जर्मन लीने आपले शतक शानदार पद्धतीने पूर्ण केले. वन्सने या षटकात एकूण 22 चेंडू टाकले आणि 77 धावा दिल्या. यानंतर कॅंटरबरी संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी 18 धावांची गरज होती.

जर्मन लीने पहिल्या पाच चेंडूत १७ धावा केल्या, पण शेवटच्या चेंडूवर त्याला एकही धाव करता आली नाही आणि सामना अनिर्णित राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *